#SurajChavan #ankitawalawalkar #BigBossMarathi #Shorts Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner : मरीआई पावली! सगळ्यांच्या बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस’ विजेता #bigbosshindi #surajchavanbiggboss
पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे.

सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालंय. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरचढ ठरलाय.

टॉप 6 मधून सूरजने मारली बाजी
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं.

सूरज चव्हाण कोण आहे?
मूळचा बारामतीचा असलेला सूरज हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडीलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.

बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. पण बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

‘बिग बॉस मराठी ५’ च्या विजेत्याची रक्कम २५ लाख होती. मात्र घरात खेळल्या गेलेल्या टास्कमुळे ही रक्कम कमी होऊन ८ लाखांवर आली होती. मात्र पुन्हा ही रक्कम २५ लाख करण्यात आली. त्यानंतर जान्हवी त्यातील ९ लाख घेऊन घराबाहेर झाली. आता सूरजला अखेर १४ लाख रकमेचा चेक मिळाला आहे. तर त्याला इ स्कुटर देखील देण्यात आली आहे. तर यासोबतच पु ना गाडगीळ यांच्याकडून १ लाखांच दागिने खरेदी करण्यासाठी व्हाऊचर देण्यात आलं आहे. या सर्व भेटवस्तू विजेत्याला मिळाल्या आहेत.

अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पैसे कमावण्यासाठी सुरजने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याचा इथवरच प्रवास मुळीच सोपा नव्हता. शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सुरजने या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची त्याच्या गावी जाऊन समजूत काढली होती. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे.

#shorts
#shortsvideo
#shortsvideo
#bigboss #bigbossmarathi
#biggbosslive #shortsfeed #shortsviral
#shortsyoutube #youtubeshorts
#maharashtra #marathinews #reels
#reel #reelsinstagram #surajchavanbiggboss
#comedy #shortsbeta #share #shortfeed

suraj chavan,suraj chavan love story,suraj chavan girlfriend,suraj chavan bigg boss,suraj chavan big boss,vaibhav chavan,bigg boss marathi suraj chavan,suraj chavan reels,suraj chavan in bigg boss marathi,suraj chavan in bigg boss,suraj chavan comedy video,yogita chavan,suraj chavan story,suraj chavan dj song,suraj chavan goligat,suraj chavan vs janvi,suraj chavan dialogue,suraj chavan big boss marathi,suraj chavan bigg boss comedy

Don’t Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra’s No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

——————————————————————————-
☛ Please Like, Share, Support & Subscribe – Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra’s No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We’ve expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here