शुक्रिया (धन्यवाद ) गेली 75 वर्षे आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यरत असलेल्या लोकांना धन्यवाद देण्यासाठी सुरु करण्यात आलेला हा हृदयस्पर्शी, समावेशक उपक्रम आहे. कोविड-19 महामारीच्या काळात अत्युत्कृष्ट समर्पण आणि मनोधैर्य यांचे दर्शन घडवून आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच इतर सर्व क्षेत्रात आघाडीवर काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसारखेच उत्तम कार्य केलं आहे आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत या क्षेत्राची कामगिरी उंचावून आर्थिक व्यवहारांचे परिचालन सुरु ठेवण्यात यश मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here